सकाळ डिजिटल टीम
बाजारात आरकाल अनेक फळे, फूड हे केमिकलचा वापर करून बनवले जाते.
लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खायला आवडते.
केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का?
केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखावा जाणून घ्या.
नैसर्गिक आंब्याचा रंग हलका पिवळा असतो. केमिकलने पिकवलेल्या आंब्याचा रंग गडद आणि त्यावर हिरवे डाग असू शकतात.
नैसर्गिक आंब्याला गोड, फळांचा वास असतो. केमिकलने पिकवलेल्या आंब्याला रसायनांचा किंवा वेगळा वास येऊ शकतो.
नैसर्गिक आंबे घट्ट असतात, तर केमिकलने पिकवलेले आंबे मऊ किंवा थोडे नरम वाटू शकतात.
नैसर्गिक आंब्यात जास्त रस असतो, तर केमिकलने पिकवलेल्या आंब्यात कमी रस असू शकतो.
एका भांड्यात पाण्यात थोडा बेकिंग सोडा मिसळून त्यात आंबे 15-20 मिनिटे भिजवा. नंतर ते धुऊन पहा.जर आंब्याचा रंग बदलत असेल, तर तो केमिकल पद्धतीने पिकवलेला किंवा पॉलिश केलेला असू शकतो.