सकाळ डिजिटल टीम
सध्या गुंतवणूक घोटाळे वाढत आहेत, म्हणून सतर्क राहणे आणि आपल्या कष्टाच्या पैशांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला कोणत्याही धोक्याशिवाय, जोखमीशिवाय भरपूर पैसे कमावता येतील, असे कोणी सांगत असेल, तर ते धोक्याचे चिन्ह आहे.
फसवणूक करणारे लोक नेहमी तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल, असे सांगतात. एका महिन्यात किंवा एका वर्षात पैसे दुप्पट होणे किंवा अशी असामान्य कमाई, या गोष्टी खऱ्या जगात अशक्य आहेत.
कंपनीची माहिती घ्या. कंपनीचे फेसबुक, गुगल पेज पहा. ते किती जुने आहे ते तपासा. त्यावर किती आणि कोणत्या प्रकारच्या पोस्ट आहेत, याचीही बारकाईने पाहणी करा.
केवळ परताव्याचा आकडा ऐकून हरखून न जाता तो परतावा कंपनी कशा प्रकारे देणार आहे, याबद्दल प्रश्न विचारा.
गुंतवणूक नोंदणीकृत आहे का ते तपासा? ‘सेबी’मध्ये नोंदणी आहे का? त्यांचा परवाना आहे का ते तपासा? कंपनीचा पॅन आणि जीएसटी क्रमांक तपासा.
गुंतवणूक घोटाळे अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत आहेत; पण योग्य ज्ञान आणि सावधगिरीने तुम्ही यात फसणार नाही.