How to Check Milk Purity : दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंढेंचा महत्त्वाचा सल्ला

Sandeep Shirguppe

दुधातील भेसळ गंभीर समस्या

नवजात बालके आणि लहान मुलांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने दुधातील भेसळ अत्यंत चिंताजनक असे मत तुकाराम मुंढे यांचे आहे.

Milk | sakal

सिंथेटिक दूधासाठी रसायनांचा वापर

पाम ऑईल, इतर तेल, स्किम मिल्क पावडर आणि विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जाते.

Milk | sakal

शॅम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर

काही प्रकरणांमध्ये सिंथेटिक दूध बनवण्यासाठी शॅम्पू, साबण आणि डिटर्जंट वापरल्याचे तपासात आढळले.

Milk | sakal

कमी खर्चात बनावट दूध

गायीच्या दुधासाठी सुमारे ₹15 प्रति लिटर आणि म्हशीच्या दुधासाठी सुमारे ₹30 प्रति लिटर खर्चात कृत्रिम दूध तयार होते.

Milk Benefits | sakal

प्रत्येक टप्प्यावर तपासणी आवश्यक

संकलन केंद्र, चिलिंग सेंटर आणि डेअरी प्लांटपर्यंत दुधाची तपासणी आणि नोंद ठेवणे बंधनकारक आहे.

Milk | sakal

ग्राहकांसाठी महत्त्वाचा सल्ला

केवळ ब्रँडवर विश्वास ठेवू नका; पॅकेजवरील फॅट, SNF, घटक, पॅकेजिंग तारीख, 'बेस्ट बिफोर' आणि एक्सपायरी डेट तपासूनच दूध खरेदी करा.

Milk Benefits | sakal

३२ टक्के नमुने निकृष्ट किंवा असुरक्षित

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील सुमारे ३२% दूध नमुने सबस्टँडर्ड किंवा असुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.

Milk Benefits | sakal

कडक कारवाईचा इशारा

असुरक्षित अन्नपदार्थांबाबत कायद्यात जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असून दुधातील भेसळ रोखण्यासाठी तपासणी आणखी वाढवण्याचे आदेश दिल्याचे मुंढे यांनी सांगितले.

Milk Benefits | sakal

Fennel with Rock Sugar Good for health

|

Sakal

आणखी पाहा...