दालचिनी घेताय की झाडाची साल? अशी ओळखा original दालचिनी!

सकाळ डिजिटल टीम

कॅसिया की अस्सल दालचिनी?

अनेकदा बाजारात अस्सल सीलोन दालचिनीच्या नावाखाली जाड आणि कडक असणारी 'कॅसिया' साल विकली जाते, जी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

काडीचे थर आणि जाडी

अस्सल दालचिनीची साल पातळ, नाजूक आणि अनेक थरांची असते. याउलट कॅसियाची साल अतिशय जाड, कडक आणि एकच जाड थर असलेली असते.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

हातात धरल्यावर जाणवणारा फरक!

अस्सल दालचिनीची काडी हातात घेतल्यास अतिशय हलकी जाणवते आणि सहज तुटते, तर नकली कॅसियाची काडी जड आणि सहजासहजी न तुटणारी असते.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

सुगंध आणि चवीतील फरक!

खऱ्या दालचिनीला उबदार, गोडसर आणि नैसर्गिक सुगंध असतो. कॅसियाचा वास मात्र अतिशय तीव्र आणि चव तिखटसर असते.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

पावडरऐवजी अख्खी काडी

पावडरमध्ये भेसळ ओळखणे कठीण असते. त्यामुळे नेहमी काडी खरेदी करून गरजेनुसार घरीच दळून वापरणे सुरक्षित ठरते.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

आरोग्यासाठी का आहे घातक?

कॅसियामध्ये 'कूमारिन' नावाचे रसायन जास्त असते. याचे रोज जास्त प्रमाणात सेवन केल्यास यकृतावर (लिव्हर) वाईट परिणाम होऊ शकतो.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

साठवणुकीची योग्य पद्धत!

दालचिनी नेहमी स्वच्छ आणि हवाबंद डब्यात ठेवावी. वाफ, ओलावा आणि चुलीच्या उष्णतेपासून तिला दूर ठेवल्यास तिचा सुगंध टिकून राहतो.

Fake Cinnamon: How to Spot Real Ceylon Dalchini

|

sakal 

नवरा-बायकोमध्ये वाढतोय 'Food Divorce'; काय आहे नवा ट्रेंड?

What is Food Divorce?

|

sakal 

आणखी वाचा