Anushka Tapshalkar
सर्वांच्या आवडीचं आणि विविध भारतीय पदार्थांमध्ये वापरलं जाणारं पनीर प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.
परंतु अनेक हॉटेल्समध्ये ॲनालॉग पद्धतीचं बनावट पनीर वापरलं जातं.
FSSAI च्या नियमानुसार, ॲनालॉग पनीरमध्ये दुधाच्या ऐवजी पर्यायी घटकांचा समावेश असतो. जे खऱ्या पनीरसारखेच दिसतात.
पुढे काही टेस्ट्स दिल्या आहेत ज्या मार्फत खरं आणि खोटं पनीर ओळखता येते.
खरे पनीर गुळगुळीत आणि किंचित ठिसूळ असते, त्याला दुधाचा ताजा वास येतो. तर ॲनालॉग पनीर जास्त रबरासारखे असते आणि त्याला दुधाचा ताजा वास येत नाही, कारण ते वनस्पती तेलापासून बनवलेले असते.
खरे पनीर गरम केल्यावर त्यातून दुधातील फॅट निघते आणि ते किंचित तपकिरी होते. तर ॲनालॉग पनीर गरम केल्यावर जास्त प्रमाणात पाणी सोडते आणि त्याचा पोत रबरासारखा वाटतो.
पनीर उकळून गार झाल्यावर त्यावर काही थेंब आयोडिन टिंचर टाका. जर रंग निळसर झाला तर त्यात स्टार्च असून ते बनावट असण्याची शक्यता आहे.
पनीर उकळून गार केल्यावर त्यात तूर डाळीची पूड मिसळून १० मिनिटे ठेवून पहा. जर रंग हलका लालसर झाला तर त्यात डिटर्जंट किंवा युरिया असू शकतो.
पनीर उकळून गार केल्यावर त्यात सोयाबीन पावडर मिसळा. जर रंग हलका लालसर झाला, तर त्यात डिटर्जंट किंवा युरियाचा समावेश असू शकतो.
भारतात ॲनालॉग पनीरची विक्रीव कायदेशीर आहे. परंतु FSSAI नियमानुसार, त्यावर "नॉन-डेअरी" असे स्पष्टपणे लिहिले असणे आवश्यक आहे.