Aarti Badade
लोहाच्या कमी पातळीमुळे शरीरात ॲनिमिया होऊ शकतो, ज्यामुळे थकवा, कमजोरी, आणि विविध शारीरिक समस्या होऊ शकतात.
गूळ आणि फुटाणे याचा वापर आपल्या आहारात नियमित करा. हे पदार्थ स्वस्त असून लोहाची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. दोन जेवणांच्या दरम्यान गूळ आणि फुटाणे खाल्ल्याने लाभ होईल.
काळे तीळ शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. थोडे भाजून त्याचे सेवन करा, किंवा ते सलाड, कोशिंबीर किंवा नाश्त्यात टाकून खा.
आवळा, मध आणि मिरेपूड याचे मिश्रण तयार करा आणि नियमितपणे खा. हे मिश्रण शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी मदत करतो.
पालकमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. शंभर ग्रॅम पालकच्या भाजीमधून ४ मिलीग्रॅम लोह मिळू शकते. नियमित पालक खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन वाढू शकते.
अंड्यात अनेक पोषक घटक असतात. अशक्तपणा कमी करण्यासाठी चिकन किंवा मटणाचे सूप फायदेशीर ठरते. शंभर ग्रॅम चिकन किंवा मटणामध्ये ०.७ ते २.१ मिलीग्रॅम लोह मिळते. उकडून किंवा ग्रील करून खा.
बीटामध्ये फोलेटचे प्रमाण अत्यधिक असते आणि लोहही मिळते. शंभर ग्रॅम बीटामध्ये ०.८ मिलीग्रॅम लोह मिळते. बीट खाण्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होऊ शकते.
तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या पदार्थांचे नियमित सेवन करा