शरीरात रक्ताची पातळी वाढवण्यासाठी रोज 'खा' 'हे' सुपरफूड्स!

Aarti Badade

ॲनिमिया आणि थकव्याची समस्या

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत 'ॲनिमिया' (Anemia) म्हणतात, हेच शरीरातील सततचा थकवा आणि अशक्तपणाचे मुख्य कारण असते.

hemoglobin increase foods

|

Sakal

हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे सेवन

रक्तातील लाल पेशी वाढवण्यासाठी भरपूर लोह (Iron) असलेल्या पालक आणि मेथीसह डाळिंब, सफरचंद आणि बीटचा रोजच्या आहारात समावेश करा.

hemoglobin increase foods

|

Sakal

ड्रायफ्रूट्स आणि मोड आलेली कडधान्ये

खजूर, मनुका, बदाम, वाळवलेले अंजीर आणि मोड आलेली मटकी व चणे नियमित खाल्ल्याने शरीराला नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात लोह मिळते.

hemoglobin increase foods

|

Sakal

गुळ आणि शेंगदाण्यांचे चमत्कारी मिश्रण

गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, जे शेंगदाण्यांसोबत खाल्ल्यास शरीरात लवकर शोषले जाते आणि रक्ताची कमतरता वेगाने भरून काढते.

hemoglobin increase foods

|

Sakal

व्हिटॅमिन सी (Vitamin C) युक्त फळे

लोहयुक्त पदार्थांसोबत लिंबू, संत्री किंवा आवळा यांसारखी आंबट फळे नक्की खा, कारण व्हिटॅमिन सी मुळे शरीर लोह चांगल्या प्रकारे शोषून घेते.

hemoglobin increase foods

|

Sakal

जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळा

केवळ लोहयुक्त पदार्थ खाणे पुरेसे नाही, तर जेवणानंतर लगेच चहा-कॉफी पिणे टाळावे; कारण त्यातील घटक शरीराला लोह शोषून घेण्यास अडथळा ठरतात.

hemoglobin increase foods

|

Sakal

योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी पुरेशी झोप आणि व्यायाम गरजेचा आहे, तसेच रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लोहाच्या गोळ्या घ्याव्यात.

hemoglobin increase foods

|

Sakal

झोपण्यापूर्वी स्वतःला द्या वेळ! हृदय अन् मेंदू राहील सुपरफिट!

heart attack and brain Cleveland clinic technique

|

Sakal

येथे क्लिक करा