सकाळ डिजिटल टीम
चटणीमध्ये थोडं जास्त मीठ घालून ती जास्त काळ टिकवता येते. मीठ नैसर्गिक संरक्षक आहे.
चटणी काचेच्या स्वच्छ आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे बॅक्टेरियापासून संरक्षण मिळते.
चटणी साठवण्यापूर्वी डबे व भांडी नीट धुवा आणि वाळवूनच वापरा.
चटणीच्या वर थोडंसं मोहरीचं किंवा रिफाइंड तेल टाका. यामुळे ती लवकर खराब होत नाही.
चटणी साठवण्यासाठी हवाबंद कंटेनर वापरल्यास ऑक्सिजनचा संपर्क कमी होतो आणि टिकाऊपणा वाढतो.
फ्रीजमध्ये किंवा थंड जागी चटणी ठेवा. उष्णतेमुळे चव खराब होऊ शकते.
जेवणासाठी चटणी लहान वाटीत काढा. मूळ डब्यात हात न लावता चांगली राहते.
चटणी फारच खारट वाटली तर इतर घटक वाढवून प्रमाण वाढवा. चवही सुधारेल आणि टिकेलही.