Anushka Tapshalkar
पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढते. मिठातील काही घटक हवेतील ओलावा शोषून घेतात. त्यामुळे मिठाचे दाणे एकमेकांना चिकटतात आणि गुठळ्या तयार होतात.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
साखर तुलनेने उशिरा ओलसर दिसत असली तरी जास्त आर्द्रतेमुळे तीही चिकट होऊ शकते. डब्यात ओलसर चमचा वापरल्यास ही समस्या आणखी वाढते.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
मीठ आणि साखर नेहमी स्वच्छ, पूर्णपणे कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. डब्याचं झाकण व्यवस्थित बंद होतंय याची खात्री करा.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
सिंकजवळ हवेत ओलावा जास्त असतो. त्यामुळे मीठ आणि साखरेचे डबे सिंकपासून शक्य तितके दूर आणि कोरड्या जागी ठेवा.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
स्वयंपाक करताना तयार होणारी वाफ मिठाच्या किंवा साखरेच्या डब्यातील पदार्थांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे हे डबे गॅसच्या अगदी जवळ ठेवू नका.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
मीठ किंवा साखर काढताना ओला चमचा वापरू नका. चमच्यावरचा थोडासाही पाणी किंवा ओलावा डब्यात गेल्यास दाणे चिकटून गुठळ्या तयार होऊ शकतात.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
घरातील मुख्य साठा वारंवार उघडण्याऐवजी थोडं मीठ किंवा साखर छोट्या हवाबंद डब्यात काढून ठेवा. यामुळे मुख्य साठ्याचा दमट हवेबरोबर संपर्क कमी होईल.
Tips to Keep Salt and Sugar Dry in Monsoon
sakal
Salt in Bathroom Benefits
sakal