उन्हाळ्यात 'या' 6 सोप्या घरगुती उपायांनी पोटाला मिळेल थंडावा!

Aarti Badade

तीव्र उष्णता आणि पोटाच्या समस्या

उन्हाळ्यात तीव्र उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता आणि बाहेरील मसालेदार जेवणामुळे पोट सारखे बिघडते, अशा वेळी नेहमी हलके व पचायला सोपे अन्न खाणे फायद्याचे असते.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

दही खाल्ल्याने नैसर्गिक थंडावा

उन्हाळ्यात रोज दही खाल्ल्याने पोटात थंडावा निर्माण होतो, पचन प्रक्रिया जलद होते आणि गॅस, अपचन तसेच अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या मुळापासून दूर होतात.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

केळ

केळ हे पचायला अतिशय सहज आणि हलके असून पोटाला त्वरित आराम देते; यातील फायबर आणि पोटॅशियममुळे बद्धकोष्ठता (Constipation) दूर होऊन पचन यंत्रणा मजबूत होते.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो आणि अ‍ॅसिडिटी, अपचन तसेच छातीतील जळजळ झटक्यात दूर होते.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

कलिंगड

कलिंगड शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवून उन्हाळ्यात पचन यंत्रणा उत्तम ठेवते; मात्र आरोग्याच्या सुरक्षेसाठी जास्त वेळ कापून ठेवलेले कलिंगड कधीही खाऊ नये.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

पपई

पपईमध्ये 'पपेन' (Papain) नावाचे पाचक एंझाईम असते, जे जड अन्न सहज पचवण्यास मदत करते आणि गॅस किंवा पोटा फुगण्याच्या समस्येपासून आराम देते.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

नारळ पाणी

नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राखते, पोटाला आतून थंडावा देते, अ‍ॅसिडिटी कमी करते आणि उन्हाळ्यात डिहायड्रेशनच्या धोक्यापासून शरीराचे रक्षण करते.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी

सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याने शरीराची पचनशक्ती वाढते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि उन्हाळ्यात शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात.

Summer Gut Health Diet Tips

|

Sakal

GK : 5000 वर्षांनंतरही खाण्यायोग्य! जगातील एकमेव असा 'हा' पदार्थ कधीच खराब का होत नाही?

Honey Never Expires Science

|

Sakal

येथे क्लिक karकरा