सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात सीताफळची मागणी खूप वाढते. लोक या फळाची रसाळ आणि गोड चव चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.
पण, आजकाल चविष्ट सीताफळ बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही गोड सीताफळ सहज खरेदी करू शकता..
गोड सीताफळ खरेदी करण्यासाठी, प्रथम त्याच्या आकाराकडं लक्ष द्या. सीताफळ जितके मोठे असेल, तितके त्यात कमी बिया असतील आणि ते गोड असेल.
नेहमी गडद हिरवे आणि साधारण पिवळसर सीताफळ खरेदी करा. भरपूर डाग असलेले सीताफळ खायला चांगली नसते, म्हणून ते विकत घेऊ नका.
सीताफळच्या देठावर डाग असल्यास किंवा ते थोडेसे कोमेजले असल्यास ते विकत घेऊ नका. कारण, ते लवकर खराब होऊ शकते.
सीताफळ ताजे आणि पिकलेले दोन्ही चवीचे असते. कमी पिकलेले सीताफळ जास्त काळ घेतल्यास त्याची चव चांगली येत नाही आणि ते खराब होतात.
जर सीताफळ जास्त पिकले असेल, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा, कारण हे फळ सामान्य तापमानात लवकर पिकते. तसेच ते एक-दोन दिवसांत खावे.