Saisimran Ghashi
आता व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे अशात प्रत्येकजण प्रेमाची कबुली देण्याचा विचार करत असते.
पण तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्तिही तुमच्यावर प्रेम करते का मग तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात एकदा बघाच.
तुम्ही संदेश पाठवल्यावर त्यांच्याकडून कमी प्रतिसाद मिळतो.
तुम्हीच अधिक वेळ आणि ऊर्जा खर्च करता, परंतु ते फारसे प्रयत्न करत नाहीत.
तुम्ही त्यांच्याशी अधिक वेळ घालवण्याची इच्छा असते, पण ते तुमच्याशी बोलण्यात कमी वेळ घालवतात.
तुम्ही त्यांच्याशी प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असता, पण ते सदैव शंका घेतात.
तुम्ही त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी तुमचा स्वभाव, कपडे, आवडीनिवडी बदलता,पण समोरून कोणताच प्रतिसाद दिसत नाही.
प्रेम ही आनंद देणारी भावना आहे पण जर प्रेमात तुम्हाला तणाव आणि निराशा मिळत असेल तर ते एकतर्फी असते.
तुम्ही नेहमी त्या व्यक्तीबद्दल विचार करत असता पण त्या व्यक्तीला तुमच्या अस्तित्वाची जाणीव नसते.