Saisimran Ghashi
सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चर्चेचा विषय बनलेला आहे.
कारण जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमध्ये शासनाने नवे नियम लागू केले आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही अटी शर्ती आणि पडताळणी विना लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला.
पण आता लाडक्या बहिणींना महिना 1500 रुपये मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील.
फेब्रुवारीच्या ४ तारखेपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
नव्या नियमानुसार ज्या घरात चार चाकी गाडी आहे त्या घरातील महिला या योजनेचा घेऊ लाभ शकणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेच्या नियामावली प्रमाणे लाभार्थी महिलेचे वय १८ ते ६५ असावे तसेच तिने अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असून घरात कोणीही शासकीय नोकरी करत नसावे.
या सर्व नियम निकषांना पूर्ण करणाऱ्या महिलाच लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील. बाकी महिलांना यातून वगळले जाईल.