Monika Shinde
आजच्या काळात मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं मोठं आव्हान बनलं आहे. पण काळजी करू नका काही साधे उपाय वापरून हे सहज शक्य आहे.
ही चार सोपी सूत्रं तुमचं काम नक्कीच सोपं करतील
मोबाईलचा अतिवापर त्यांच्यासाठी कसा हानिकारक आहे, हे शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगा. कारण समजले की, नियम सहज पाळले जातात.
मोबाईलऐवजी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. घरात किंवा बाहेर एकत्र खेळल्याने मुलांचं लक्ष मोबाईलवरून हटतं.
अभ्यास, खेळ, जेवण, विश्रांती यासाठी ठराविक वेळ दिल्यास मुलं शिस्तीत राहतात आणि मोबाईलसाठी वेळ राहत नाही.
फोन त्यांच्या हाती सहज मिळणार नाही याची काळजी घ्या. त्यांच्या वयात मोबाईलचा सहज प्रवेश टाळा.