पुजा बोनकिले
प्रत्येक सणासुदीत गोड पदार्थ बनवले जातात.
अनेकांना बासुंदी खुप आवडते.
बासुंदी बनवण्यासाठी दुध, साखर, वेलची पावडर, सुकामेवा या साहित्याची गरज असते.
बासुंदी बनवण्यासाठी सर्वात पहिले दूध चांगले गरम करावे.
नंतर मध्यम माचेवर दूध चांगले शिजवावे.
हे करत असताना चमचा सतत ढवळत ठेवावा.
नंतर दूध घट्ट झाल्यावर त्यात साखर टाका.
नंतर सुकामेवा आणि वेलची पावडक टाकून सर्व्ह करू शकता.
तुम्ही सजावटीसाठी केशर, पिस्ताचे बारिक तुकडे वापरू शकता.