सकाळ डिजिटल टीम
दाढीचा रंग कालांतराने पांढरा किंवा फिकट होऊ शकतो, विशेषतः वयानुसार; पण आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये दाढी अकाली पांढरी होणे ही एक सामान्य समस्या बनत चाललीये.
पण, जर तुमची दाढी अकाली पांढरी होत असेल तर काळजी करू नका. कारण, आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत.
हळद आणि नारळाचे तेल दाढीच्या केसांसाठी चांगले आहे. एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट दाढीवर लावा आणि काही वेळाने धुवा.
आवळा दाढीचे केस काळे करण्यास मदत करतो. तुम्ही आवळ्याचा रस काढून तुमच्या दाढीवर लावू शकता आणि काही वेळाने धुवू शकता. याशिवाय, तुम्ही आवळा पावडर आणि पाणी मिसळून पेस्ट बनवून दाढीवर लावू शकता.
नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेलाने दाढीची मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होतात. यामुळे दाढीचे केस काळे होण्यास मदत होते.
पांढऱ्या दाढीचे केस काळे करण्यासाठी मेंदीचा वापर करता येतो. सर्वप्रथम, मेंदी पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट दाढीवर लावा आणि 30-40 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर धुवा.
तुमच्या आहाराचा तुमच्या केसांच्या रंगावर परिणाम होतो. जर तुम्ही योग्य पोषण घेतले तर तुमचे केस लवकर पांढरे होणार नाहीत. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन ई आणि लोहयुक्त पदार्थ खाल्ल्याने केस निरोगी राहू शकतात.
आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमची दाढी काळी करायची असेल तर तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी, मासे आणि फळे यांचा समावेश करा. तसेच केसांच्या मुळांना पोषण मिळावे म्हणून जास्तही पाणी प्या.