कुरकुरीत 'रावस फ्राय' बनवा घरच्या घरी! नोट करा 'ही' सोपी रेसिपी!

Aarti Badade

मासेप्रेमींसाठी खास मेजवानी

कमी काटे आणि मऊसर पोत असलेला 'रावस' मासा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता आहे.

Rawas Fish Fry

|

Sakal

फिश फ्रायसाठी आवश्यक साहित्य

रावसचे तुकडे, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, लिंबू रस, मीठ, रवा आणि तांदळाचे पीठ तयार ठेवा.

Rawas Fish Fry

|

Sakal

मॅरिनेशन

माशाचे तुकडे स्वच्छ धुवून त्याला आलं-लसूण पेस्ट, लिंबू रस आणि सर्व सुके मसाले लावून ३० मिनिटे बाजूला ठेवा.

Rawas Fish Fry

|

Sakal

कुरकुरीतपणासाठी खास कोटिंग

एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करा; यामुळे मासे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून रसाळ होतात.

Rawas Fish Fry

|

Sakal

फ्राय करण्याची योग्य पद्धत

मॅरिनेट केलेले मासे रवा-पिठाच्या मिश्रणात घोळवून मध्यम आचेवर गरम तेलात शॅलो फ्राय करण्यासाठी सोडा.

Rawas Fish Fry

|

Sakal

दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा

माशाचे तुकडे दोन्ही बाजूंनी खमंग आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या, जेणेकरून मसाला आतपर्यंत व्यवस्थित शिजेल.

Rawas Fish Fry

|

Sakal

गरमागरम सर्व्ह करा

तयार मसालेदार 'रावस फ्राय' लिंबू, कांदा आणि हिरव्या चटणीसोबत जेवणाची रंगत वाढवण्यासाठी सर्व्ह करा.

Rawas Fish Fry

|

Sakal

कुकरमध्ये भात शिजवण्याआधी जाणून घ्या आरोग्यासाठी तांदूळ भिजवण्यामागचे शास्त्र!

Healthy way to cook rice

|

Sakal

येथे क्लिक करा