सकाळ डिजिटल टीम
अर्धा किलो बोनलेस चिकन ब्रेस्ट,1 टिस्पून आलं-लसूण पेस्ट,हिरव्या मिरचिचा ठेचा,5 टीस्पून दही,2 टीस्पून हळद,3 ते 4 टीस्पून धनेपूड,2 टीस्पून लाल मिरची पावडर,कढीपत्ता,गरम मसाला,2 चमचे कॉनफ्लोर,2 टीस्पून तांदळाचं पीठ,कोथिंबीर,मीठ
चिकन चांगल्यानं धुवून त्याचे छोटे तुकडे करा.
चिकनमध्ये आलं-लसूण पेस्ट, धनेपूड, हळद, दही, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा.
मिश्रण झाकून ठेवा आणि एक-दोन तास मॅरिनेट होऊ द्या.
मॅरिनेट झाल्यानंतर मिश्रणात कॉनफ्लोर आणि तांदळाचं पीठ घाला आणि चांगलं मिक्स करा.
गॅसवर कढई ठेवा, तेल गरम करा आणि चिकनचे तुकडे गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा.
दुसऱ्या कढईत तेल गरम करून लसूण, मिरच्यांचा फोडणी द्या, आणि त्यात तळलेलं चिकन घाला.
तयार आहे कुरकुरीत चिकन 65! गरमागरम सर्व करा.