सकाळ डिजिटल टीम
बासमती तांदूळ, 3 ते 4 उकडलेली अंडी, मीठ,6 ते 7 मिरे, 6 ते 7 लवंगा, 2 तमालपत्र, 1 चक्री फुल, 2 मसाला वेलची, 2 हिरवी वेलची, 1 इंच दालचिनी तुकडा, ½ कप दही, 1 ½ टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 ½ टेबलस्पून बिर्याणी मसाला, 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, हळद, कांदे, तळलेला कांदा, तेल.
प्रथम, 1 ½ कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवा आणि 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यात थोडे मीठ घाला.
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात खडे मसाले (लवंग, मिरे, दालचीनी, तमालपत्र, हिरवी वेलची, चक्री फुल), हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घालून खमंग परतून घ्या. दही घाला ते परतून घ्या. त्यानंतर अंडी कट न् करता तशीच त्यात घाला.
आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या, नंतर भिजवलेला तांदूळ घाला. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, केशर मिश्रित दूध घाला.
राइस भिजवलेला असला मुळे आणि अंडी बोईल करून घेतलेत म्हणून कुकरच्या 2 शिट्ट्या करा.
गॅस बंद केलानंतर कुकरचे झाकण 10 मिनिटांनंतर काढा
कुकरमध्ये झटपट चिकन - अंड बिर्याणी तयार आहे. गरम गरम सर्व्ह करा.