बाहेरील नको! आता घरीच तयार करा गव्हाचा पौष्टिक चिवडा

सकाळ डिजिटल टीम

चिवडा

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चिवडा खायला आवते.

wheat chiwda recipe | sakal

फरसाण

बाहेरील तेलगट चिवडा, फरसाण खाण्यापेक्षा आता घरीच गव्हाचा हा पौष्टिक चिवडा करून पहा.

wheat chiwda recipe | sakal

गव्हाचा चिवडा

गव्हाचा चिवडा बनवायला कोणते साहित्य लागते जाणून घ्या.

wheat chiwda recipe | sakal

साहित्य

एक वाटी गहू, अर्धा कप शेंगदाणे, एक चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, 8-10 कढीपत्ता पाने, 2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 1/4 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे तेल, मीठ चवीनुसार, 1/4 चमचा साखर (ऐच्छिक) 

wheat chiwda recipe | sakal

भिजवलेले गहू

गव्हाला 6-7 तास पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर भिजवलेले गहू चाळणीत काढून पाणी काढून टाका. ते एका सुती कापडावर पसरवून 2-3 दिवस उन्हात वाळवा.

wheat chiwda recipe | sakal

गहू भाजणे

वाळलेले गहू मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावेत. तसेच शेंगदाणे वेगळे भाजून घ्यावे

wheat chiwda recipe | sakal

फोडणी

एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि हिरवी मिरची घालून मिक्स करावे.

wheat chiwda recipe | sakal

मसाले

तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि शेंगदाणे, काजू, बेदाणे इत्यादी ऍड करू शकता.

wheat chiwda recipe | sakal

दररोज या पद्धतीने अक्रोड खा; मेंदू आणि हाडांसाठी ठरेल वरदान!

Walnuts health benefits | Sakal
येथे क्लिक करा