Aarti Badade
या रेसिपीसाठी १ कप जवसाच्या बिया, १० लसूण पाकळ्या, ४ सुक्या लाल मिरच्या, जिरे, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ एकत्र करून ठेवावे.
jawas chutney
Sakal
प्रथम कढईत जवसाच्या बिया मंद आचेवर कोरड्या भाजून घ्याव्यात आणि बिया तडतडू लागल्या की लगेच गॅस बंद करावा.
jawas chutney
Sakal
बिया काढल्यानंतर त्याच कढईत जिरे आणि सुक्या लाल मिरच्या हलक्या भाजून घ्याव्यात, ज्यामुळे चटणीला छान तिखट चव येते.
jawas chutney
Sakal
चटणी मऊ पडू नये म्हणून भाजलेला जवस, मिरच्या आणि जिरे एकत्र करून ते पूर्णपणे गार किंवा थंड होऊ द्यावे.
jawas chutney
Sakal
साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये लसूण, शेंगदाणा कूट आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर चालू-बंद करत जाडसर वाटून घ्यावे.
jawas chutney
Sakal
चटणी अधिक खमंग करण्यासाठी थोडे सुके खोबरे भाजून घालू शकता आणि तिखट हवे असल्यास सुक्या मिरच्यांचे प्रमाण वाढवावे.
jawas chutney
Sakal
तयार झालेली ही पौष्टिक चटणी कोरड्या व हवाबंद डब्यात घट्ट झाकण लावून ठेवल्यास सहजपणे ८ ते १० दिवस टिकते.
jawas chutney
sakal
Health benefits of drinking almond milk
Sakal