Aarti Badade
उन्हाळ्याच्या ऋतूत जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी कच्च्या कैरीपासून बनवलेला आंबट-गोड मुरांबा हा एक सर्वोत्तम आणि लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे.
Kairicha muramba recipe
Sakal
हा चविष्ट मुरांबा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि मुख्य म्हणजे तुम्ही एकदाच बनवून हा पदार्थ हवाबंद बरणीत वर्षभर सुरक्षित साठवू शकता.
Kairicha muramba recipe
Sakal
यासाठी ४-५ मध्यम आकाराच्या कडक कैऱ्या, २ कप साखर, १ चमचा वेलची पावडर, थोडे केशर (ऐच्छिक) आणि १ चमचा लिंबाचा रस घ्या.
Kairicha muramba recipe
Sakal
सर्वप्रथम हिरव्या कैऱ्या चांगल्या धुवून आणि सोलून घ्या, त्यानंतर त्यांच्या बिया वेगळ्या करून तुकडे एका स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करा.
Kairicha muramba recipe
Sakal
एका मोठ्या भांड्यात पाणी उकळवून त्यात कैरीचे तुकडे ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या, जेणेकरून ते हलके मऊ होतील पण जास्त विरघळणार नाहीत.
Kairicha muramba recipe
Sakal
आता एका पॅनमध्ये २ कप पाणी आणि साखर एकत्र करून गॅसवर ठेवा आणि साखर विरघळून पाक चांगला घट्ट होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या.
Kairicha muramba recipe
Sakal
या तयार पाकात कैरीचे तुकडे, वेलची पावडर व केशर घाला आणि कैरीचे तुकडे थोडे पारदर्शक दिसेपर्यंत मिश्रण चांगले शिजवून घ्या.
Kairicha muramba recipe
Sakal
शेवटी गॅस बंद करण्यापूर्वी त्यात लिंबाचा रस मिक्स करा, मुरांबा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर तो काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा.
Kairicha muramba recipe
Sakal
Beetroot Idli Recipe
Sakal