Aarti Badade
रोज सकाळी कांदापोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असल्यास आणि मुले बाहेरचे खाण्याचा हट्ट करत असल्यास, घरच्या घरी झटपट पौष्टिक 'बीटरूट इडली' बनवा.
Beetroot Idli Recipe
Sakal
लोहाचा (Iron) उत्तम स्त्रोत असलेले बीट शरीरातील रक्ताची कमतरता, अशक्तपणा आणि थकवा दूर करते, तसेच हे पचायला अतिशय हलके आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते.
Beetroot Idli Recipe
Sakal
नाश्त्यामध्ये नेहमीची पांढरी इडली खाण्याऐवजी ही आकर्षक लाल रंगाची इडली पाहून मुले आवडीने खातात आणि त्यांच्या शरीराला आवश्यक पोषणही मिळते.
Beetroot Idli Recipe
Sakal
ही इडली बनवण्यासाठी तुम्हाला बीटचा ताजा रस, रवा (सुजी), दही, पाणी, चवीनुसार मीठ, तेल आणि इडली मऊ होण्यासाठी 'इनो' (Eno) लागेल.
Beetroot Idli Recipe
Sakal
सर्वप्रथम एका मोठ्या वाटीमध्ये रवा आणि दही एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा, जेणेकरून रव्यामध्ये कोणत्याही गुठळ्या (Lumps) राहणार नाहीत.
Beetroot Idli Recipe
Sakal
त्यानंतर या मिश्रणात बीटचा रस आणि मीठ घालून हलवून घ्या; गरजेनुसार थोडे पाणी मिसळा आणि हे मिश्रण काही वेळ बाजूला झाकून ठेवा.
Beetroot Idli Recipe
Sakal
आता इडलीच्या पात्राला थोडे तेल लावून मिश्रण ओता आणि १५ मिनिटे वाफवून घ्या; शेवटी हलके पाणी शिंपडून गरमागरम मऊ बीटरूट इडली खायला सर्व्ह करा.
Beetroot Idli Recipe
Sakal
Betel Leaf Added While Preparing Ghee
Sakal