उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा आंबा-अननसाची स्मूदी

Monika Lonkar –Kumbhar

वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे.

फळे

उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी फळांची मदत घेतली जाते.

शरीर कूल ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि स्मूदी बनवल्या जातात. आज आपण आंबा-अननसाची स्मूदी कशी बनवायची? ते जाणून घेऊ.

आंबा आणि अननसाची स्मूदी बनवण्यासाठी सर्वात आधी पिकलेल्या आंब्याचा गर काढून घ्या.

स्मूदी बनवण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी आंब्याचा गर आणि अननसाचे तुकडे फ्रीजमध्ये काही वेळासाठी ठेवा.

आता बर्फाचे तुकडे, आंब्याचा गर, अननसाचे तुकडे आणि संत्र्याचा रस मिसळून मिक्सरला बारीक करून घ्या.

तुमची आंबा अन् अननसाची स्मूदी तयार आहे. आता काचेच्या ग्लासमध्ये ही स्मूदी काढून घ्या.

फेस रोलरच्या मदतीने सैल झालेल्या त्वचेची करा सुट्टी..!

Benefits of Face Roller | esakal