केसातला कोंडा होईल गायब! फक्त 15 मिनिटांत बनवा 'हा' शॅम्पू

Aarti Badade

उन्हाळ्यातील केसांच्या समस्या

उन्हाळ्यात घाम आणि उष्णतेमुळे केसांमध्ये कोंडा आणि स्कॅल्पला खाज सुटण्याची समस्या अनेकांना सतावत असते.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

केमिकलयुक्त शॅम्पूला नैसर्गिक पर्याय

बाहेरील केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्याऐवजी, घरीच कडुलिंबाच्या पानांपासून बनवलेला हर्बल शॅम्पू केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

शॅम्पू बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

यासाठी तुम्हाला १ मूठभर ताजी कडुलिंबाची पाने, २ कप पाणी, २-३ चमचे सौम्य लिक्विड साबण आणि थोडे कोरफडीचा गर लागेल.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

शॅम्पू बनवण्याची सोपी कृती

कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून ते पाणी निम्मे होईपर्यंत उकळा. थंड झाल्यावर गाळून त्यात लिक्विड साबण आणि कोरफडीचा गर नीट मिक्स करा.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

वापरण्याची योग्य पद्धत

हा नैसर्गिक शॅम्पू ओल्या केसांवर आणि स्कॅल्पवर लावून हळुवार मालिश करा. २-३ मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून टाका.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

कोणासाठी आहे अधिक फायदेशीर?

ज्यांना कोंडा, खाज सुटणारी किंवा तेलकट स्कॅल्पचा त्रास आहे, तसेच ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हा शॅम्पू अतिशय उत्तम आहे.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

या शॅम्पूमध्ये कोणतेही प्रिजर्व्हेटिव्ह नसल्यामुळे तो जास्त काळ ठेवू नका. वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.

Homemade Neem Shampoo

|

Sakal

जेवणानंतर करा 'हे' 1 काम... रक्तातील साखर राहील कायम नियंत्रणात!

exercise to control sugar spike after meal

|

Sakal

येथे क्लिक करा