Aarti Badade
शंकरपाळी हा एक असा गोडाचा पदार्थ आहे, जो भारतभर आवडीने खाल्ला जातो. चला, त्याची सोपी आणि खुसखुशीत रेसिपी पाहूया.
Sweet Shankarpali
Sakal
१ कप साखर,१ कप तेल,१/२ कप दूध, १/२ कप पाणी,४ कप मैदा,चिमूटभर मीठ
Sweet Shankarpali
Sakal
एका भांड्यात तेल, साखर, दूध आणि पाणी एकत्र करून गॅसवर गरम करा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
Sweet Shankarpali
Sakal
थंड झालेल्या मिश्रणात मैदा आणि मीठ घालून घट्ट पीठ मळून घ्या. हे पीठ अर्धा ते एक तास बाजूला ठेवा.
Sweet Shankarpali
Sakal
आता पिठाचा मोठा गोळा घेऊन जाडसर पोळी लाटा. सुरीच्या साहाय्याने शंकरपाळीला चौकोनी किंवा आवडीनुसार आकार द्या.
Sweet Shankarpali
Sakal
कढईत तेल गरम करा आणि त्यात शंकरपाळी तळा. सुरुवातीला मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
Sweet Shankarpali
Sakal
शंकरपाळी गुलाबी रंगावर आल्यावर लगेच काढून घ्या. थंड झाल्यावर ती आणखी कुरकुरीत होईल.
Sweet Shankarpali
Sakal
Diwali Faral poha chivda
Sakal