कोळंबी आवडणाऱ्यांसाठी... फक्त 10 मिनिटांत तयार करा चटपटीत तवा प्रॉन्स मसाला

Aarti Badade

सीफूड

जर तुम्हाला सीफूड आवडत असेल, तर 'तवा प्रान्स मसाला' ही तुमची पहिली पसंती असेल. कमी वेळात आणि घरच्या साहित्यात बनणारी ही डिश चवीला अतिशय अप्रतिम लागते.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

लागणारे साहित्य

१५-२० मोठे प्रान्स (कोळंबी),४ उभे चिरलेले कांदे, २ टोमॅटो,आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता,घरगुती तिखट मसाला, कोकम आगळ, कोथिंबीर

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

पूर्वतयारी आहे महत्त्वाची

सुरुवातीला कोळंबी स्वच्छ धुवून घ्या. कांदे उभे चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरून ठेवा आणि कोथिंबीर बारीक चिरून तयार ठेवा. यामुळे स्वयंपाक वेगाने होतो.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

फोडणीचा सुवास

लोखंडी तव्यावर तेल गरम करा. त्यात हिंग, कढीपत्ता आणि आले-लसूण पेस्ट टाकून परतून घ्या. उभा चिरलेला कांदा, मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परता.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

मसाल्यांची जुगलबंदी

कांदा परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट, घरगुती मसाला आणि धने-जिरे पावडर मिक्स करा. आता टोमॅटो घालून ५ मिनिटे झाकण ठेवून वाफेवर मसाला शिजवून घ्या.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

कोळंबीची एन्ट्री

मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात प्रान्स (कोळंबी) आणि कोथिंबीर मिक्स करा. पुन्हा ५ मिनिटे झाकण ठेवून शिजवा. लक्षात ठेवा, कोळंबी जास्त शिजवू नका, अन्यथा ती रबरासारखी कडक होते.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

कोकम आगळचा तडका

शेवटी यात 'कोकम आगळ' आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. कोळंबीला सुटलेले पाणी आटेपर्यंत परता. कोकममुळे प्रान्स मसाल्याला एक वेगळीच आंबट-झणझणीत चव येते.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

सर्व्हिंग टीप

तुमचा गरमागरम तवा प्रान्स मसाला तयार आहे! वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर पसरवा. लिंबू, कांदा आणि ताकदीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत याचा आस्वाद घ्या.

Tawa Prawns Masala Seafood Recipe

|

Sakal

कुकरमध्ये तयार करा झणझणीत कोळंबी भात; पाहुणेही होतील खुश!

लिंक कमेंटमध्ये