Apurva Kulkarni
फुटाणे हे शरीरासाठी फायदेशीर असतात. पंरतु ते घरच्या घरी कसे बनवतात माहिती आहे का? जाणून घ्या रेसिपी
HOMEMADE FUTANE
esakal
हरभऱ्याचे फुटाणे बनवण्यासाठी २ वाटी सुके हरभरे,३ चमचे मोठे मीठ, हळद आणि पाणी
CRISPY ROASTED CHANA
esakal
एका भांड्यात २ वाटी सुके हरभरे द्या. त्यानंतर त्यात मीठ, हळद घालून तीन चार चमचे पाणी टाका.
ALTED ROASTED CHANA RECIPE,
esakal
हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्या. मीठ पाण्यामध्ये विरघळून सर्व चण्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे.
DRY CHANA RECIPE
esakal
ते मीठ लावलेले हरभरे कमीत कमी अर्धा ते एक तास झाकून बाजूला ठेवा. त्यामुळे मीठ चण्यांच्या आतपर्यंत मुरेल.
ROASTED CHICKPEAS RECIPE
esakal
त्यानंतर कढई गरम करायला ठेवा. त्यात आता मीठ लावलेले चणे टाका.
HEALTHY ROASTED CHANA
esakal
त्यानंतर गॅस मध्यम ते मोठा ठेवून सतत हलवत राहा. त्याने चणे कुरकुरीत होतील.
CRUNCHY CHANA SNACK
esakal
चणे नीट फुटले किंवा कडक झाले की गॅस बंद करा. त्यानंतर ते थंड होऊ द्या.
CHANA SNACK RECIPE
esakal
थंड झाल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात भरुन ठेवा. ते महिनाभर कुरकुरीत राहतील.
ROASTED CHANA BENEFITS
esakal
KHARE SHENGDANE RECIPE
esakal