सकाळ डिजिटल टीम
उपवासासा साबुदाणा खिचडी, भगर खावून कंटाळा आलाय मग आता हा कुरकुरीत साबुदाणा ढोकळा ट्राय करून पहा
साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साबुदाणा ढोकळा बनवण्यासाठी १ कप साबुदाणा, १ मध्यम आकाराचा बटाटा (उकडलेला आणि मॅश केलेला), १/२ कप घट्ट दही, २ चमचे शेंगदाणा कूट (दाणे कुटलेले), १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली किंवा पेस्ट), १ चमचा आले पेस्ट, १ चमचा लिंबाचा रस, चवीनुसार सैंधव मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, १/२ चमचा इनो फ्रूट सॉल्ट (पर्यायी) हे साहित्य वापरावे.
साबुदाणा स्वच्छ धुवा आणि ४-५ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. नंतर पूर्ण पाणी काढून टाका, जेणेकरून तो चिकट होणार नाही.
एका मोठ्या भांड्यात भिजवलेला साबुदाणा, मॅश केलेला बटाटा, दही, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची पेस्ट, आले पेस्ट, लिंबाचा रस आणि मीठ घ्या. सर्व साहित्य चांगले मिसळून घ्यावे.
जर तुम्ही इनो वापरत असाल, तर बॅटरमध्ये इनो घालून हलक्या हाताने एकजीव करा. इनो घातल्यावर मिश्रण लगेच फुगू लागते.
ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये डिश तयार करू शकता. एका ग्रीस केलेल्या ढोकळ्याच्या डब्यात किंवा ताटलीत बॅटर समान रीतीने पसरा.
ढोकळ्याचे भांडे कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये ठेवून मध्यम आचेवर १० ते १५ मिनिटे वाफवून घ्या. ढोकळा शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरी घालून तपासा; जर सुरी स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा शिजला आहे. असे समजावे.
ढोकळा थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून हिरवी चटणी किंवा दह्यासोबत तुम्ही तो सर्व्ह करू शकतात.