Aarti Badade
पिस्तामध्ये व्हिटॅमिन B6, C, कॅल्शियम, झिंक, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
दररोज १५-२० ग्रॅम पिस्ता खाल्ल्याने हृदय आणि मेंदू निरोगी राहतात.
पिस्ता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतो आणि वजनही नियंत्रित करतो.
पिस्तामध्ये असणारे पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्यासोबत त्वचा व केसांसाठीही उपयुक्त ठरतात.
पिस्ता उष्ण असल्याने थंड हवामानात अधिक फायदेशीर असतो.
सकाळच्या नाश्त्यात पिस्ता घेतल्यास दिवसभर ऊर्जा मिळते.
पिस्ता दुपारच्या जेवणाआधी खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते.
पिस्ता रात्री खाल्ल्यास पचनासाठी कठीण ठरतो. त्यामुळे रात्री टाळणे उत्तम.
आयुर्वेदानुसार, पिस्ता दिवसा खाल्ल्यास त्याचे सर्वाधिक फायदे मिळतात.