मुलांच्या आवडीची श्रीखंडाची गोळी बनवा घरीच

Pranali Kodre

लहानपणीची आठवण

अनेकांनी लहानपणी श्रीखंडाची गोळी खाल्ली असेल. गोड-आंबट चव असणारी ही गोळी घरीही बनवू शकतो.

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

साहित्य

अर्धा किलो दही, तूप,१०० ग्रॅम साखर, १७५ ग्रॅम पिठीसाखर, एक चमचा वेलची पुड, खाण्याचा केशरी रंग

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

चक्का

दही पातळ कापड्यात घेऊन ते कापड घट्ट बांधून रात्रभर ठेवा म्हणजे दह्यापासून चक्का तयार होईल.

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

चक्का आणि साखर एकत्र शिजवा

त्यानंतर एका पातेल्यात हा चक्का आणि साखर खालून शिजायला ठेवत ते ढवळत राहा.

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा

साधारण १०-१५ मिनिटांनी साखर विरघळल्यानंतर त्याल वेलची पुड आणि केशरी रंग घाला. हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत शिजवा.

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

गोळा

हे मिश्रण खोलगट भांड्यात काढून घेतल्यानंतर त्यात थोडीथोडी पिठीसाखर घाला, ज्यामुळे गोळा थोडा कोरडा होईल.

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

श्रीखंडाच्या गोळ्या

त्यानंतर एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण पातळ थापा आणि छोटे गोल आकार किंवा आवडीचे आकार पाडा. झाल्या श्रीखंड्याच्या गोळ्या तयार

Homemade Shrikhand Goli

|

Sakal

Video: 'बोलो तारा रा रा' अभिषेक शर्माचा दिवाळीनिमित्त कुटुंबासोबत भन्नाट डान्स

Abhishek Sharma Dance Video

|

Sakal

येथे क्लिक करा