सकाळ डिजिटल टीम
बारीक चिरलेला कांदा,1 टेस्पून शेंगदाणा तेल,चवीनुसार मीठ,1 टीस्पून लाल काश्मिरी मिरची पावडर,1/2 टीस्पून हिंग,1 टेस्पून चिरलेली कोथिंबीर
एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, मीठ आणि लाल मिरची पावडर घाला.
एका पातेल्यात शेंगदाणा तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात हिंग टाका आणि 5-10 सेकंद शिजवा.
सुगंधी गरम तेल कांद्याच्या मिश्रणावर ओता.
सर्व सामग्री चांगली मिसळा.
चिरलेली कोथिंबीर चटणीवर घाला
सिंहगड स्पेशल कांदा चटणी चपातीसोबत किंव्हा कांद्याची खेकडा भजी सोबत सर्व्ह करा.