सकाळ डिजिटल टीम
दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी होत आहे. या दिवशी बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला विविध गोड पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे. मोदक हा बाप्पाचा प्रिय पदार्थ असला तरी इतर काही पदार्थही बाप्पाला खूप आवडतात.
श्रीखंड हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोड पदार्थ आहे. दही, साखर, वेलची आणि केशर यांचे मिश्रण करून श्रीखंड तयार केला जातो.
मोतीचूर लाडू हा एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. बेसन, साखर, तूप, वेलची आणि काजू यापासून बनवला जातो.
पारंपरिक पदार्थ पुरण पोळी ही हरभरा डाळ, वेलची, गूळ आणि तूप यापासून पुरण पोळी तयार केली जाते. घरच्या घरी या स्वादिष्ट पदार्थाची तयारी करा आणि बाप्पाला अर्पण करा.
नारळाच्या दुधात भात शिजवून तयार होणारा हा पदार्थ चवीला अप्रतिम असतो. तूप, गूळ किंवा साखर घालून हा भात चवीला छान लागतो.
शिरा हा पदार्थ प्रतेक धार्मिक कार्यक्रमात बनला जातो. केळी मॅश करून बनवला जाणारा शिरा चवीला खास लागतो.
सध्या हिवाळा सुरू आहे बाप्पाला गाजराचा हलवा देखील दाखवू शकता.