Anushka Tapshalkar
बारीक चिरलेला पालक, बेसन, कणीक, दही, हिरवी मिरची, आले, तिखट, मीठ, साखर, तेल, मोहरी, जिरे.
एका भांड्यात पालक, बेसन, कणीक, दही, आणि सर्व मसाले मिसळा.
मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा.
डंपलिंग्स 8-10 मिनिटे वाफवून घ्या.
तेल गरम करून त्यात जिरे आणि मोहरी टाका.
फोडणीत वाफवलेले डंपलिंग्स टाका आणि 3-4 मिनिटे परतून घ्या.
आवडीच्या चटणी किंवा सॉससह गरमागरम सर्व्ह करा.
पौष्टिक आणि तिखटसर चवीचे हे डंपलिंग्स नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे!