Apurva Kulkarni
तुम्ही जर दररोज पोहे, उपमा, डोसा, इडली. ढोकळा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी करू शकता.
तुम्ही सुशीलाविषयी ऐकले आहे का? तुम्हाला वाटेल सुशीला म्हणजे काय? तर सुशीला हे एखाद्या मुलीचे नाव नसून पदार्थाचे नाव आहे.
हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य घ्यावेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
चुरमुरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, दाळ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, हिंग, हळद, मीठ, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी आणि जिरे
सुरूवातीला दाळ खलबत्त्यात बारीक करून घ्या आणि भरड तयार करा.त्यानंतर चुरमुरे पाण्यात भिजून पाणी काढून घेयचं.
त्यानंतर कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्या.
त्यात हळद घाला आणि चांगले मिश्रण एकत्र करा.त्यानंतर पाण्यात भिजवून घेतलेले चुरमुरे टाका आणि सर्व मिश्रण एकजीव करा.
त्यानंतर त्यात डाळीची भरड शेंगदाण्याचा कुट आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व मिसळून घ्या. त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.वाफ काढल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.खमंग चवदार सुशीला तयार होईल.