टवटवीत अन् चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी बनवा स्वस्तात मस्त व्हिटॅमिन C सीरम!

Aarti Badade

घरगुती सीरमसाठी आवश्यक साहित्य

घरच्या घरी सीरम बनवण्यासाठी अर्धा चमचा व्हिटॅमिन सी पावडर (किंवा १ गोळी), २ चमचे गुलाबपाणी, १ चमचा कोरफडाचा गर आणि १ चमचा ग्लिसरीन घ्यावे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

पावडर गुलाबपाण्यात विरघळवणे

सर्वप्रथम एका स्वच्छ बाऊलमध्ये गुलाबपाणी आणि व्हिटॅमिन सी पावडर एकत्र करून ती पूर्णपणे विरघळू द्यावी.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

कोरफडाचा गर आणि ग्लिसरीन

पावडर विरघळल्यावर त्यात कोरफडाचा गर व ग्लिसरीन (किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल) टाकून सर्व मिश्रण गुठळ्या न होता व्यवस्थित एकजीव करावे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

साठवण्याची योग्य पद्धत

तयार झालेले सीरम एका गडद रंगाच्या काचेच्या हवाबंद ड्रॉपर बाटलीत भरून फ्रीजमध्ये साठवून ठेवावे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

वापरण्याची अचूक वेळ

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा आणि या सीरमचे फक्त २ ते ३ थेंब चेहरा व मानेवर हलक्या हाताने लावावेत.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

१० ते १२ दिवसांची मर्यादा

हे घरगुती सीरम फ्रीजमध्ये ठेवून जास्तीत जास्त १० ते १२ दिवसच वापरावे आणि त्यानंतर पुन्हा नवीन ताजे सीरम बनवावे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

ऑक्सिडाईज झाल्यास वापरू नका

प्रकाशाच्या संपर्कात आल्यास व्हिटॅमिन सी खराब होते; जर सीरमचा रंग गडद नारंगी किंवा तपकिरी झाला तर ते वापरणे त्वरित बंद करावे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

सनस्क्रीन लावणे आवश्यक

व्हिटॅमिन सी सीरम वापरल्यामुळे त्वचा संवेदनशील होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर पडताना चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे.

Vitamin C Serum at Home

|

Sakal

पोटावर झोपल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो? जाणून घ्या सत्य

Sleeping on Your Stomach Cause Heart Attack

|

Sakal

येथे क्लिक करा