महागडा परफ्यूमही टिकत नाही? 7 सोप्या टिप्समध्ये मिळवा लॉन्ग-लास्टिंग सुगंध

Aarti Badade

सुगंध टिकवण्यासाठी पहिली पायरी

परफ्यूम लावण्यापूर्वी तुमची त्वचा 'मॉइश्चराइज' करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुगंध हा कोरड्या त्वचेपेक्षा ओलसर त्वचेवर अधिक काळ टिकतो.

Long lasting perfume tips

|

Sakal

'पल्स पॉइंट्स'वर करा स्प्रे

मनगट, मान, कानामागे आणि कोपराच्या आतील भागावर परफ्यूम लावा. शरीरातील हे 'पल्स पॉइंट्स' नैसर्गिक उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे सुगंध दिवसभर दरवळतो.

Long lasting perfume tips

|

Sakal

कपड्यांवर हलकी फवारणी

केवळ त्वचेवरच नाही, तर कपड्यांवरही हलका स्प्रे करा. कापड त्वचेपेक्षा अधिक वेळ सुगंध धरून ठेवते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.

Long lasting perfume tips

|

Sakal

केसांसाठी खास युक्ती

केसांवर थेट स्प्रे करण्याऐवजी, कंगव्यावर थोडा परफ्यूम फवारून तो केसांतून फिरवा. यामुळे केसांना इजा न होता सुगंध सौम्य आणि दीर्घकाळ टिकतो.

Long lasting perfume tips

|

Sakal

परफ्यूम लावण्याची योग्य वेळ

अंघोळीनंतर लगेच जेव्हा त्वचा स्वच्छ आणि थोडी ओलसर असते, तेव्हा परफ्यूम लावल्यास तो त्वचेवर अधिक चांगल्या प्रकारे सेट होतो.

Long lasting perfume tips

|

Sakal

परफ्यूमची साठवणूक महत्त्वाची

तुमचा परफ्यूम उष्णता, आर्द्रता आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर, थंड व कोरड्या ठिकाणी ठेवा. यामुळे सुगंधाची मूळ रचना बदलत नाही.

Long lasting perfume tips

|

Sakal

सुगंध नसलेले लोशन वापरा

परफ्यूमचा सुगंध अधिक प्रभावी होण्यासाठी सुगंध नसलेले (Unscented) लोशन किंवा बॉडी ऑइल वापरा. यामुळे परफ्यूमचा मूळ वास अधिक ठळकपणे जाणवतो.

Long lasting perfume tips

|

Sakal

दृष्टी जाण्याआधी डोळे देतात 'हे' संकेत!

Eye health symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा