सकाळ डिजिटल टीम
परीक्षेच्या तणावाचे कारण हे विद्यार्थ्यांना असलेली अपेक्षा, तयारीची भीती आणि विविध चिंतेतून असतो.
परीक्षेच्या काळातील तणाव स्वाभाविक असतो. त्यांना दडपण्याऐवजी, तो कसा कमी होईल या कडे लक्ष दिले पाहिजे.
अभ्यासाची तयारी पूर्ण होईल का याची चिंता न करता, नियमितपणे अभ्यास केला की परीक्षेच्या वेळी ताण येत नाही.
वेळापत्रक तयार करून त्या प्रमाणे रोजचा रोज थोडा थोडा अभ्यास केल्याने परीक्षेच्या वेळी तणाव येत नाही.
कठीण विषयांचा अभ्यास आधी करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि इतर विषयांवर लक्ष केंद्रीत होईल.
तुमची तयारी चांगली आहे. अशी सकारात्मक भावना असली पाहिजे.
शारीरिक आरोग्यही तणाव व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि व्यायाम करा.
शिक्षक, पालक किंवा मित्रांकडून मार्गदर्शन घ्या. तुमच्या तणावावर मार्गदर्शन व सल्ला खूप उपयोगी ठरू शकतो.