थायरॉईडचा त्रास कमी करायचा? ‘या’ सवयी बदलल्या तर मिळेल आराम!

Aarti Badade

जीवनशैली आणि थायरॉईड

बदलती जीवनशैली आणि तणावामुळे आजकाल अनेक महिलांना थायरॉईडचा त्रास होत आहे. मानेतील ही लहान ग्रंथी शरीराची चयापचय क्रिया नियंत्रित करते.

Thyroid control tips

|

Sakal

सोया प्रॉडक्ट्स टाळा

थायरॉईडची समस्या असल्यास सोयाबीन आणि सोया दूध टाळावे. यामुळे थायरॉईडच्या औषधांच्या परिणामात अडथळा निर्माण होऊ शकतो.

Thyroid control tips

|

Sakal

कच्च्या भाज्या खाणे थांबवा

कोबी, ब्रोकोली आणि फुलकोबी कच्च्या स्वरूपात खाऊ नका. या भाज्या नीट शिजवून खाल्ल्याने त्यातील 'गॉयट्रोजेन'चा शरीरावरील प्रभाव कमी होतो.

Thyroid control tips

|

sakal

आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे सेलेनियम व झिंकयुक्त पदार्थ हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

Thyroid control tips

|

Sakal

साखरेचे आणि कॅफीनचे प्रमाण

प्रक्रिया केलेले जंक फूड, जास्त साखर, चहा-कॉफी आणि अल्कोहोल शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, त्यामुळे यांचा वापर मर्यादित ठेवा.

Thyroid control tips

|

Sakal

तणाव आणि व्यायाम

दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने करा. ध्यानामुळे तणाव कमी होऊन हार्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Thyroid control tips

|

Sakal

पुरेशी झोप

हार्मोन्सच्या संतुलनासाठी दररोज ७-८ तास गाढ झोप घेणे आवश्यक आहे. तसेच, दर ३ ते ६ महिन्यांनी थायरॉईड प्रोफाईल तपासणी नक्की करा.

Thyroid control tips

|

Sakal

मधुमेहाच्या रुग्णांनी नक्की खावा ‘हा’ सुपरफूड! रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Garlic benefits for diabetes

|

sakal

येथे क्लिक करा