सकाळ डिजिटल टीम
किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल मुलांच्या नैराश्याचं कारण बनू शकतात.
कुटुंबातील ताण, शाळेतील दडपण, सामाजिक त्रास, आणि हार्मोनल बदल यामुळे किशोरवयीन मुलं उदास होतात.
भावनिक सतत उदास वाटणं, चिडचिडेपणा, आणि निराशेची भावना. शारीरिक झोपेच्या सवयींमध्ये बदल, अन्न न खाणं, आणि थकवा जाणवणं. वागणुकीतील बदल मित्रांपासून दूर रहाणं, अभ्यासात मागे पडणं, आणि एकटे राहणं.
आत्महत्येचे विचार, नकारात्मक विचार आणि आत्महत्येचा धोका. यासाठी तात्काळ उपचार आवश्यक.
संज्ञानात्मक वर्तन थेरपी (CBT) नकारात्मक विचारांची सकारात्मकतेत रूपांतर. औषधोपचार गंभीर नैराश्यसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं.
आत्महत्येचा धोका असल्यास शॉकथेरपी (Electroconvulsive Therapy) वापरणं.
शाळांमध्ये समुपदेशन, पालकांसाठी जागरूकता, आणि लक्षणं दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं.
मैदानी खेळ, व्यायाम, डिजिटल स्क्रीनचा मर्यादित वापर, योग्य आहार आणि झोपेचं नियोजन.
योग्य उपचार न घेतल्यास मुलांमध्ये नैराश्य पुन्हा होण्याची शक्यता 50-70% असते.