सकाळ डिजिटल टीम
बेसन चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते आणि त्वचेचा टोन सुधारते.
2 चमचे बेसन आणि थोडे कच्चे दूध मिक्स करा. चेहऱ्यावर लावा, मसाज करा आणि 10 मिनिटांनी स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ आणि मुलायम होईल.
2 चमचे बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करा. चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी स्वच्छ करा.टॅनिंग दूर करा आणि रंग सुधारा.
1-2 चमचे बेसन आणि 1 चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा, 10 मिनिटांनी काढा. त्वचा मऊ आणि गुळगुळीत होईल.
2 चमचे बेसन आणि टोमॅटो पल्प मिक्स करा. चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा, नंतर स्वच्छ करा.vचेहरा ताजातवाना आणि चमकदार होईल.
तेलकट त्वचेसाठी, बेसन, टोमॅटो पेस्ट आणि गुलाबजल मिक्स करा.मसाज करा आणि 5-10 मिनिटे ठेवा, नंतर चेहरा धुवा.
1 चमचा बेसन, अर्धा चमचा हळद आणि चंदन पावडर मिक्स करा. चेहऱ्यावर लावून सुकवून पाणीाने धुवा. पुरळ कमी होईल आणि त्वचा शांत होईल.