कोर्टाचे जज होण्यासाठी कशी तयारी करावी?

Monika Shinde

कोर्टाचे जज

कोर्ट जजला आयएएस अधिकाऱ्यापेक्षा अधिक शक्तिशाली मानले जाते, परंतु तुम्हाला माहीत आहे का? जज कसे बनतात आणि त्यासाठी काय तयारी करावी लागते, याची माहिती घेऊया.

शैक्षणिक पात्रता

जज बनण्यासाठी, तुम्हाला १२ वी नंतर कायद्याचं (Law) शिक्षण घेणं आवश्यक आहे. यासाठी एलएलबी डिग्री प्राप्त करणं गरजेचं आहे.

परीक्षा देणं आवश्यक

एलएलबी डिग्री मिळवल्यानंतर, तुम्हाला न्यायिक सेवा परीक्षा (Judicial Service Exam) किंवा राज्य सिव्हिल न्यायिक परीक्षा पास करावी लागते.

निवड प्रक्रिया

लिखित परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला मुलाखतीसाठी आमंत्रित केलं जातं. त्यानंतर मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्याच्या आधारावर निवड प्रक्रिया केली जाते.

न्यायिक सेवा भरती

राज्य लोकसेवा आयोग नियमितपणे सिव्हिल जजांची भरती प्रक्रिया घेतो. याच भरती प्रक्रियेतून जजांची नियुक्ती केली जाते.

हायकोर्ट जज कसे बनतात?

अनुभवाच्या आधारावर, जिल्हा न्यायालयात काम करणारे जज हायकोर्टमध्ये जज होण्यासाठी अर्ज करू शकतात. हायकोर्ट जज होण्यासाठी संबंधित पात्रता आणि अनुभव असावा लागतो.

चेहऱ्याला कॉफी मास्क लावा आणि त्वचेच्या सौंदर्यात करा वाढ!

येथे क्लिक करा...