मूतखड्याचा त्रास नकोय? आजपासूनच पाळा ‘या’ 9 सोप्या सवयी!

Aarti Badade

मूतखडा का होतो?

चुकीचा आहार आणि पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीमध्ये क्षार साचतात, ज्याचे रूपांतर नंतर मूतखड्यात होते. हा त्रास टाळण्यासाठी काही साधे बदल करणे आवश्यक आहे.

Kidney stone prevention

|

Sakal

पाण्याचे प्रमाण वाढवा

दिवसभरात किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असल्यास लघवी वाटे क्षार बाहेर पडतात आणि खडे तयार होत नाहीत.

Kidney stone prevention

|

Sakal

मिठावर नियंत्रण ठेवा

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरात कॅल्शियम साचते, ज्यामुळे स्टोनचा धोका वाढतो. आहारात वरून मीठ घेणे टाळा आणि प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ कमी खा.

Kidney stone prevention

|

sakal

ऑक्सलेटयुक्त पदार्थ टाळा

जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास होण्याची शक्यता असेल, तर पालक, बीट, चॉकलेट, सुकामेवा आणि टोमॅटो यांसारख्या ऑक्सलेटयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित करा.

Kidney stone prevention

|

Sakal

लिंबूपाण्याचे सेवन करा

लिंबू किंवा संत्री यांसारख्या सिट्रस फळांमध्ये 'सिट्रेट' असते. हे सिट्रेट किडनीमध्ये खडे तयार होण्याची प्रक्रिया रोखण्यास मदत करते.

Kidney stone prevention

|

Sakal

प्रोटीनचा अतिरेक नको

लाल मांस (Red Meat) आणि अतिप्रथिनयुक्त आहारामुळे शरीरात यूरिक ॲसिड वाढते. यामुळे यूरिक ॲसिड स्टोन होण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रोटीनचे प्रमाण योग्य ठेवा.

Kidney stone prevention

|

Sakal

लघवी रोखून धरू नका

वेळेवर लघवीला जाण्याची सवय लावा. लघवी रोखून धरल्याने किडनीमध्ये क्रिस्टल्स जमा होतात, जे पुढे मूतखड्याचे रूप घेतात.

Kidney stone prevention

|

Sakal

वजन आणि साखर

लठ्ठपणामुळे मूतखड्याचा धोका वाढतो. तसेच जास्त साखर आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळा, कारण यामुळे किडनीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Kidney stone prevention

|

Sakal

कॅल्शियमचे संतुलन

कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करू नका, परंतु त्याचा अतिरेक टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमची पातळी योग्य राखणे गरजेचे आहे.

Kidney stone prevention

|

sakal

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

मूतखड्याची लक्षणे दिसल्यास किंवा तीव्र वेदना झाल्यास स्वतः उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Kidney stone prevention

|

Sakal

'टीबी'ची ही गंभीर लक्षणे वेळीच ओळखा; दुर्लक्ष करणे पडेल महागात

Tuberculosis टीबी symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा