Aarti Badade
सर्दी-खोकला आपण सामान्य मानतो. मात्र, फुफ्फुसांत साचलेला कफ आणि दीर्घकाळ टिकणारा खोकला हा क्षयरोगाचा संकेत असू शकतो.
Tuberculosis टीबी symptoms
Sakal
क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे जो प्रामुख्याने 'मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसिस' नावाच्या जीवाणूमुळे होतो. फुफ्फुसांवर परिणाम करतो, पण तो हाडे, मेंदू आणि पोटालाही होऊ शकतो.
Tuberculosis टीबी symptoms
sakal
दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे. खोकल्यावाटे कफातून रक्त पडणे. संध्याकाळी किंवा रात्री ताप येणे आणि झोपेत घाम सुटणे.
Tuberculosis टीबी symptoms
sakal
क्षयरोगाची लागण झाल्यावर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अचानक वजन कमी होणे, भूक मंदावणे, सतत थकवा जाणवणे आणि छातीत दुखणे यांसारखी लक्षणे जाणवतात.
Tuberculosis टीबी symptoms
Sakal
ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना टीबी लवकर होतो. विशेषतः मधुमेह एचआयव्ही ग्रस्त रुग्ण किंवा कुपोषण असलेल्या व्यक्तींमध्ये याचा धोका अधिक असतो.
Tuberculosis टीबी symptoms
Sakal
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. खोकताना किंवा शिंकताना रुमाल वापरा, जेणेकरून बॅक्टेरिया हवेत पसरणार नाहीत.क्षयरोग झालेल्या व्यक्तीपासून काही काळ सुरक्षित अंतर राखा.
Tuberculosis टीबी symptoms
Sakal
टीबी हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण केल्यास तुम्ही या गंभीर आजारावर मात करू शकता.
Tuberculosis टीबी symptoms
sakal
Who should not eat papaya
Sakal