संतोष कानडे
ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा आपल्या सीटवर कुणीतरी भलतंच बसलेलं असतं.
अशावेळी बसलेला व्यक्ती उठतो. पण एखादा अडमुठेपणा करतो आणि जागेवरचा उठत नाही
जेव्हा तुमच्या सीटवरचा व्यक्ती उठत नाही, तेव्हा भांडणं होतात. या वादाचं स्वरुप मोठं होण्याची शक्यता असते.
हे सगळं टाळायचं असेल तर १३९ या हेल्पलाईन नंबरवर कॉल करुन तक्रार करता येईल.
यापेक्षा सोपा उपाय म्हणजे १३९ या क्रमांकावर एक मेसेज करुन आपली तक्रार थेट टीसीकडे करता येईल.
त्यानंतर तुम्ही जिथे आहात, तिथे टीसी येऊन तुम्हाला तुमची सीट मिळवून देईल.
त्यासाठी तुम्हाला, (PRN Number) (Seat Number) OCCUPIED BY UNKOWN PASSENGER असा मेसेज करावा लागेल
असं केल्याने तुम्हाला तुमच्या सीटचे डीटेल्स मिळतील. यावरुन तुम्ही पुढे टीसीकडे त्याची तक्रार करु शकता.