Anushka Tapshalkar
चेहऱ्यावरील रंग थंड पाण्याने धुवा. कधीही गरम पाण्याचा वापर करू नका, कारण त्यामुळे रंग अधिक घट्ट बसतो.
एक चिमूटभर हळदीत लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ती १५ मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा.
मुलतानी माती आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ती चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा.
बेसन, लिंबू आणि दूध मिसळून पेस्ट बनवा. यामुळे घट्ट रंग सहज निघतो.
कच्च्या पपईला किसून त्यात दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील रंग निघण्यास मदत होते.
चेहऱ्यावर खोबरेल तेल लावून हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर कापसाने रंग पुसून टाका.
अॅलोवेरा जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर झालेली रंगाची जळजळही कमी होते.
चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर लावणे अत्यंत गरजेचे आहे.
Beetroot face pack for glowing skin
Sakal