वॉशबेसिनचा पिवळेपणा घालवण्यासाठी काय करावे?

सकाळ डिजिटल टीम

वॉशबेसिन पिवळा का पडतो?

अनेकदा पाण्यातील क्षार, साबणाचे उरलेले थर आणि नियमित सफाई न झाल्यामुळे वॉशबेसिनवर चिवट पिवळे डाग पडतात. जे साध्या पाण्याने सहज निघत नाहीत.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal 

बेकिंग सोडा आणि पांढरा व्हिनेगर

पिवळ्या पडलेल्या भागावर २-३ चमचे बेकिंग सोडा टाका आणि त्यावर व्हिनेगर स्प्रे करा. १५-२० मिनिटांनी स्क्रबरने घासून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal 

लिंबू आणि जाडे मीठ

अर्ध्या लिंबावर थोडे जाडे मीठ टाकून बेसिनवर चांगले रगडा. लिंबातील सायट्रिक ॲसिड आणि मिठाच्या खारटपणामुळे डाग लगेच निघतात.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

ईनो किंवा सायट्रिक ॲसिड

बेसिन थोडे ओले करून त्यावर १ पाकीट ईनो टाका आणि वरून अर्धे लिंबू पिळा. १० मिनिटांनंतर स्क्रबरने घासल्यास बेसिन नव्यासारखा चमकू लागेल.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

डिशवॉश लिक्विड

कोमट पाण्यात सारख्या प्रमाणात व्हिनेगर आणि १ चमचा डिशवॉश लिक्विड मिसळा. हे मिश्रण बेसिनवर स्प्रे करून १० मिनिटांनी स्पंज ने साफ करा.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बेकिंग सोडा

जुन्या आणि घट्ट पिवळ्या डागांसाठी बेकिंग सोडा व हायड्रोजन पेरॉक्साइडची घट्ट पेस्ट बनवा. डागांवर ३० मिनिटे ठेवून स्क्रबरने साफ करा.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

ब्लीचिंग पावडर

बेसिनवर थोडी ब्लीचिंग पावडर पसरवा आणि त्यावर थोडे पाणी शिंपडून २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर ब्रशने घासल्यास पिवळेपणा आणि बॅक्टेरिया दोन्ही दूर होतात.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

टूथपेस्टचा वापर

खूप जुने डाग नसतील तर साधी पांढरी टूथपेस्ट स्क्रबरवर घेऊन पिवळ्या डागांवर घासा. ५ ते १० मिनिटांत बेसिनमधील पिवळेपणा निघून चमक येईल.

What to do if the washbasin is turning yellow?

|

sakal

'पॅकेटवरील Organic, Natural अन् Pure मध्ये नेमका फरक काय?

Truth Behind '100% Pure' Labels

|

sakal

आणखी वाचा