Anushka Tapshalkar
नवीन राउटर घेतल्यावर त्याचे डिफॉल्ट SSID वापरू नका. तुमचे वैयक्तिक माहिती उघड न होईल असे नाव निवडा.
डिफॉल्ट पासवर्ड सहज ओळखता येतो. त्याऐवजी २० अक्षरांचा मजबूत, युनिक पासवर्ड वापरा – त्यात अक्षरे, संख्या व चिन्हांचा समावेश असावा.
राउटरचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहा. यामुळे सुरक्षा त्रुटी दूर होतात.
VPN तुमचा IP अॅड्रेस लपवतो आणि इंटरनेट ब्राउझिंग एनक्रिप्ट करतो. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहते.
ISP चा बेसिक राउटर वापरण्याऐवजी चांगला राउटर घ्या – ज्यामध्ये फायरवॉल्स, VPN सुविधा असते आणि सुरक्षाही जास्त असते.
राउटरच्या अॅडमिन पॅनेलसाठी वेगळं आणि मजबूत पासवर्ड ठेवा, जेणेकरून कोणी सहज लॉगिन करू शकणार नाही.
मैत्रिणींना Wi-Fi देताना Guest Network वापरा. त्यामुळे तुमच्या मुख्य नेटवर्कची सुरक्षा अबाधित राहते.
WPS ही सुविधा सहज कनेक्ट होण्यासाठी असते, पण ती हॅकिंगसाठी सोपी वाट असू शकते. ती बंद करणं अधिक सुरक्षित ठरतं.