Aarti Badade
अनेकजण घोरणे म्हणजे शांत झोपेचे लक्षण समजतात, पण प्रत्यक्षात श्वसनमार्गात अडथळा निर्माण झाल्यास घोरण्याचा आवाज येतो.
Stop Snoring Naturally
Sakal
पाठीवर झोपल्यास जिभेचे स्नायू मागे जातात; म्हणूनच नेहमी कुशीवर झोपल्याने श्वसनमार्ग मोकळा राहून घोरणे बंद होते.
Stop Snoring Naturally
Sakal
वजन वाढल्याने मानेभोवती आणि घशाभोवती अतिरिक्त चरबी जमा होते, जी श्वसनमार्ग अरुंद करून घोरण्याची समस्या गंभीर बनवते.
Stop Snoring Naturally
Sakal
नाक बंद असल्यास व्यक्तीला तोंडाने श्वास घ्यावा लागतो; म्हणूनच झोपण्यापूर्वी वाफ घेऊन नाक स्वच्छ ठेवल्यास घोरण्याचा त्रास कमी होतो.
Stop Snoring Naturally
Sakal
झोपताना एका जादा उशीच्या साहाय्याने डोके सुमारे ४ इंच उंच ठेवल्यास श्वास घेण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही.
Stop Snoring Naturally
Sakal
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास नाक आणि घशातील कफ चिकट होतो, ज्यामुळे श्वासाला अडथळा येतो; म्हणून दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
Stop Snoring Naturally
Sakal
काही वेळा नाकाचे हाड वाकडे असणे किंवा नाकाच्या आत मांस वाढल्यामुळे हवेचा मार्ग बंद होऊन व्यक्ती मोठ्याने घोरू लागतो.
Stop Snoring Naturally
Sakal
झोपण्याची पद्धत बदलणे, वजन घटवणे आणि नाक स्वच्छ ठेवणे यांसारख्या सोप्या सवयींमुळे घोरण्याच्या समस्येपासून कायमची सुटका मिळू शकते.
Stop Snoring Naturally
Sakal
Cooked Rice Storage Tips for Food Safety
Sakal