पावसाळ्यात घराच्या बाल्कनीतील झाडं निरोगी ठेवण्याच्या सोप्या टिप्स

Pranali Kodre

झाडांची काळजी

पावसाळ्यात सर्वत्र हिरवंगार दिसत असलं तरी आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा बागेतील झाडांची काळजी घेणंही महत्त्वाचं असते.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

सोप्या पद्धतीने काळजी

काही सोप्या पद्धतीने या झाडांची काळजी आपल्याला घेता येते.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

पाण्याचा निचरा

पावसाळ्यात झाडांचे नुकसान होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे कुंडीत पाणी साचणे, ज्यामुळे मुळं कुजतात. त्यामुळे कुंडीला छिद्र असेल, तर पाण्याचा निचरा करणे महत्त्वाचे आहे.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

पावसाळ्यात पाणी देणे टाळा

पाऊस असताना झाडांना पाणी दिलं नाही, तरी चालतं. कुंडीतील माती १-२ इंच सुकलेली दिसत असेल, तरच पाणी टाका.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

Neem Oil

आठवड्यातून किंवा १५ दिवसांनी एकदा तरी कडुलिंबाचे तेल (Neem Oil) पाण्यात मिसळून झाल्यांवर स्प्रे करा, ज्यामुळे बुरशी आणि कीड रोखली जाऊ शकते.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

झाडाची स्वच्छता

झाडाची पिवळी पानं, खराब झालेली पानं लगेच काढून काटा. झाडाची आणि सभोवताली स्वच्छता ठेवा.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

खत

पावसाळ्यात थोडं ऊन पडेल, तेव्हा मातीची हलकी खुरपणी करून थोडं गांडूळ खत आणि शेणखत टाका. लिक्विड खत देणे पावसाळ्यात टाकू नका.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

आधार

पावसाळ्यापूर्वी झाडांची हलकी छाटणी करा. तसेच नाजूक झाडं कोलमडू नयेत म्हणून दोरीचा आणि काठीचा आधार द्या.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

मल्चिंग करा

मल्चिंग म्हणजे सुकलेली पानं, नाराळाच्या शेंड्या, सुकं गवत किंवा लाकडी साल यांचा वापर करून मातीवर पसरवलं तर तण कमी वाढतं, ओलावा टिकून राहातो आणि माती भुसभुशीत राहण्यास मदत होते.

Monsoon Gardening Tips

|

Sakal

मोगऱ्याला फुलं आणतील स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी, तेही शून्य खर्चात!

Mogra Plant Care Kitchen Fertilizers

|

Sakal

येथे क्लिक करा